अहिल्यानगर दिनांक ७ ऑगस्ट
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक महेश विष्णु पाटील यांची नियंत्रण कक्षा मधून नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम यांची द.वि.प. अहिल्यानगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तर द.वि.प. अहिल्यानगर चे पोलिस निरीक्षक अरविंद बळीराम जोंधळे यांना नियंत्रण कक्षात टाकण्यात आले आहे.
संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास किसन ढुमणे यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा येथे नियुक्ती करण्यात आले आहे.तर पोलिस निरीक्षक प्रविण पुंडलिक साळुंखे यांची नियंत्रण कक्षा मधून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हे आदेश काढले आहेत.