अहमदनगर दि.१२ मे –
११ मे रोजी रात्री ९च्या दरम्यान अहमदनगर ११२ काॅल मोफत मदत म्हणून कायर्रत असणाऱ्या काॅलवर पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे येथील तळीराम सचिन दिगंबर पंडीत याने काॅल केला आणि सांगितले कि, अस्मिता नावाची १६वर्षे वयाची तरुणीवर बलात्कार झाला आणि बेशुद्ध आहे.अशी माहिती दिल्याने अहमदनगर जिल्हा ११२ युनिट ला कार्यरत असणारे उपनिरीक्षक अंबादास हुलगे व महिला अंमलदार चिमा काळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात संपर्क साधून शहानिशा करण्यास सांगितले.पारनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ यांनी आपल्या फौज फाट्यासह बाभूळवाडे गाठून माहिती घेतली मात्र हा प्रकार तळिरामाने केला असल्याचं उघड झाल्यावर संबंधित काॅल करणारा तळिराम सचिन दिगंबर पंडीत याच्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल संदिप पालवे यांचे फिर्यादी नुसार आयपीसी कलम १७७ सह दारुबंदी अधिनियम ८५(१)अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.
*प्रतिक्रिया – ११२ काॅल हा मदत साठी मोफत सुविधा उपलब्ध आहे.कोणी बोगस काॅल केला तर त्यांचावर पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचा मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात येईल -अहमदनर ११२ येथे कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक अंबादास हुलगे यांनी सांगितले