Homeक्राईमहेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखाआणि तोफखाना पोलिसांनी...

हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखाआणि तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

advertisement

अहमदनगर दिनांक 9 ऑक्टोबर

हेरंब रामचंद्र कुलकर्णी जलवा यांना शनिवारी दुपारी सावडी परिसरातील रेणाविकर महाविद्यालयाच्या जवळ मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते या प्रकरणी हेरंब कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती तोफखाना पोलिसांनी या तक्रारीनुसार अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि कलम ३०७, ३२४, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

तोफखाना पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या एका पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार,बापुसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, दत्ता हिंगडे, पोना/लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, संतोष खैरे,विशाल गवांदे, विजय ठोंबरे, पोकॉ/सागर ससाणे, रविंद्र घुंगासे चापोहेकॉ/संभाजी कोतकर तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोसई/सचिन रणशेवरे, पोहेकॉ/दत्तात्रय जपे, पोना/अविनाश वाकचौरे, पोकॉ/शिरीश तरटे, पोकॉ/सतिष भवर यांच्या पथकाने
शहरातील गुन्हा घडले ठिकाणचे तसेच, निलक्रांती चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, प्रेमदान हाडको, जोशी क्लासेस येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासून या सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास केला असता हा गुन्हा सुडके मळा येथे राहणाऱ्या चैतन्य सुनील सुडके याने केला असल्याचा निष्पन्न झालं.

पोलिसांनी अधिक तपास केला असता चैतन्य याचा मित्र अक्षय विष्णू सब्बन याच्या मालकीची सिताराम सारडा महाविद्यालय जवळ पानाची टपरी असून ही टपरी शाळे जवळ असल्याने हेरंब कुलकर्णी यांनी ही टपरी काढावी याकरता महानगरपालिकेकडे तक्रार केली होती याचा राग मनात धरून अक्षय विष्णु सब्बन याचे सांगणेवरुन चैतन्य सुनिल सुडके रा. सुडकेमळा, अहमदनगर, अक्षय पुर्ण नांव माहित नाही, सनि जगधने, एक अल्पवयीन मुलगा यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी अक्षय सब्बन, चैतन्य सुडके एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून यामधील अक्षय पूर्ण नाव माहित नाही तो फरार असून सनी जाधव हा पण फरार असल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे या आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुना शाखा आणि तो खाना पोलीस स्टेशनचे एक पथक रवाना झाले आहे

सदरची कारवाई राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अनिल कातकाडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular