अहमदनगर दि.२६ सप्टेंबर –
बनावट सोने तारण प्रकरणात दिवसेंदिवस कर्जाची रक्कम आणि बनावट सोने सापडणे वाढतच चालले आहे. त्याचा प्रमाणे आता यातील आरोपींची संख्याही वाढत चालली असून या बनावट सोने तारण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने अजून एका आरोपीला ताब्यात घेतले असून सचिन लहानबा जाधव ( निमगाव वाघा)असे त्याचे नाव असून त्याच्या कडून बनावट सोनेतारण प्रकरणी आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच अजूनही तीन ते चार मोहरके याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर असून या म्होरक्यांनी गरजवंत लोकांना फसवून त्यांच्या नावे बनावट सोने ठेवून कर्ज प्रकरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या (Shree Sant Nagebaba Multistate Co Urban Credit Society) केडगाव शाखेत बनावट सोनेतारण ठेवल्याचं घोडके झाल्यानंतर पोलिसांनी काही संशयित खाते तपासले आहेत या ठिकाणी तब्बल २३२१ ग्रँम बनावट सोने पोलिसांनी जप्त केले आहे तब्बल ७६ लाख रुपयांचा कर्ज घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे तर अहमदनगर शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाचा लोगो काही बनावट दागिन्यांवर छापलेला आढळून आला आहे. पोलीस याप्रकरणी आता चौकशी करण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना.बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, करत आहेत.