अहमदनगर दि.२७ सप्टेंबर –
बनावट सोने तारण प्रकरणात दिवसेंदिवस रोज नवनवीन माहिती समोर येत आहे या प्रकरणात आता सचिन जाधव या आरोपीची एन्ट्री झाल्यानंतर त्याच्या माहितीनुसार पोलिसांनी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को अर्बन क्रेडिट सोसायटीच्या (Shree Sant Nagebaba Multistate Co Urban Credit Society) पाच संशयित खात्यातून तब्बल 31 तोळे बनावट सोने सुमारे 10 लाख 84 हजार रुपयांचे बनावट सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
सचिन लहानबा जाधव ( निमगाव वाघा) याच्या कडून बनावट सोनेतारण प्रकरणी आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तसेच अजूनही तीन ते चार म्होरके याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर असून प्लीज लवकरच त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे त्यामुळे या बनावट सोने तारण प्रकरणाची व्याप्ती हळूहळू वाढत चालली आहे.
या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजेंद्र इंगळे , पोना.बापुसाहेब गोरे, पोकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोरुडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोना सलिम शेख, बंडू भागवत, पोकॉ सुमित गवळी, करत आहेत.