अहमदनगर दि.16 सप्टेंबर
भीती कुणाची कशाला ….. या गाण्यावर त्यांनी दुपारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डान्स केला आणि काही वेळातच त्यांच्यावर काळाने घाला घातला..हसतमुख असलेला जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.
तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मोरे हे हसतमुख असलेला कर्मचारी अनेकांच्या मदतीला धावणारा आणि संपूर्ण पोलीस दलात आपल्या हसतमुख चेहऱ्याने सर्वांना आपलेसे करणारा ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचे निधन सर्वांना मनाला चटका लावून गेला आहे.
आज तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे याने मराठी चित्रपट गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर बप्पा मोरे घरी गेले आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे.
ज्ञानेश्वर मोरे यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे कामामुळे येणारा सततचा ताण ऑन ड्युटी 24 तास राहणे आणि गुन्ह्यांचा तपास यामुळे अनेक पोलिसांना आरोग्याच्या समस्या आहेत मात्र तणावमुक्त जीवन जगणे हाच खरा मूलमंत्र घेऊनच पोलिसांनीही काम करावे.