अहिल्यानगर दि.18 डिसेंबर
अहिल्यानगर जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवैध कत्तलखाण्यावर धडक कारवाया सुरु करण्यात आल्या आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून म्हणजे 1 डिसेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर, संगमनेर तसेच लोणी या ठिकाणच्या परिसरात छापे टाकून पंधरा दिवसात तब्बल 13 टन गोमांससह 110 जनावरांचीं सुटका केली आहे. या मध्ये आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून 63 आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.