Homeशहरसुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीर फटाके स्टॉल उभारून रस्त्यावर फटाके विक्री...

सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता बेकायदेशीर फटाके स्टॉल उभारून रस्त्यावर फटाके विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे पोलीस,महापालिका आणि महसूल विभागाची डोळेझाक, आग लागण्याची मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण ?

advertisement

.अहमदनगर दि.२२ ऑक्टोबर

दिवाळी सुरू झाली असून फराळ, आकाशदिवे रंगेबिरंगी लाईट आणि फटाका विक्रीची दुकाने थाटली असून कोरोना नंतरची बंधन मुक्त दिवाळी यावर्षी साजरी होत आहे. शहरातील विविध भागातून फटाका स्टॉलसाठी आत्तापर्यंत महसूल ,महापालिका प्रशासन ,पोलीस,या विभागांकडून परवानगी घेऊनच फटका स्टॉल उभे राहिले आहेत.

फटाके व्यवसायिकांना एक फटाका स्टॉल लावण्यासाठी महसूल पोलीस महानगरपालिका आणि इतर प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत शासकीय फी भरण्याचा खर्च येतो . परवाना देताना मोकळे मैदान आणि पत्र्याचे शेड , अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि वाहतूक पोलीस यांची परवानगी यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासह नियम व अटी-शर्ती लागू केल्या जातात.

अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारून दोन सर्व कागदपत्रे सादर करून फटाका विक्री स्टॉलचा परवाना मिळतो त्यानंतर दुकान उभारणे आणि या ठिकाणी होलसेल दुकानदारांकडून फटाके विक्रीसाठी माल घेऊन हा स्टॉल सुरू होतो खरा मात्र यानंतर मोठी समस्या उभी राहते ती म्हणजे बेकायदेशीर रस्त्यावर कोणताही परवाना न घेता फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांची कारण एकीकडे शासकीय परवाना घेऊन व्यापार करत असताना दुसरीकडे कोणताही परवाना घेता महानगरपालिकेच्या रस्त्यावर दुकान थाटून विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांमुळे कायदेशीर परवाना घेऊन व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसतो.

अहमदनगर शहरातील गंगा उद्यान मागील उपनगर फटाका असोसिएशन त्यानंतर सावेडी बस स्थानक परिसरातील फटाका असोसिएशन आणि कल्याण रोड वरील जाधव पेट्रोल पंप शेजारील मैदानात उभारण्यात आलेले होलसेल फटाका व्यापाऱ्यांना तसेच केडगाव फटाका असोसिएशन अशा मोठ्या असोसिएशन धारकांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून परवाने दिले आहेत.

मात्र आता शहरात विविध ठिकाणी पलंग टाकून छोटे-मोठे फटाका व्यवसायिकांची गर्दी दिसून येत आहे.मात्र या ठिकाणी काही आग लागण्याची घटना घडली तर याला जबाबदार कोण?असा प्रश्न आता समोर येत आहे. कारण या ठिकाणी कोणतीही साधनसामग्री नसताना आणि आजूबाजूला छोटी मोठी इतर दुकाने असल्यामुळे ग्राहकांची गर्दी असते आणि या ठिकाणी आग लागली तर याला जबाबदार कोणाला धरणार असा प्रश्न उपस्थित राहतोय. तसेच महानगरपालिका ,पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने अशा बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासन डोळे झाकण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांना याचा फटका बसत असून अशा बेकायदेशीर रस्त्यावर बसून फटाका विक्री करणाऱ्या फटाका व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे.फटाके ज्वलनशील आणि धोकादायक असून त्याची विक्री करताना नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे
आहे. बेकायदा स्टॉल असतील तर अतिक्रमण आणि पोलीस विभागाने त्यावर कारवाई केली पाहिजे.

कुठे आहेत बेकायदेशीर फटाकडे स्टॉल

नगर शहरातील वाडिया पार्क समोरील रस्ता, माळीवाडा,पंचपीर चावडी, सर्जेपुरा ,तोफखाना,चितळे रोड, दिल्ली गेट, सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक एकविरा चौक,पाईपलाईन रोड,भिस्तबाग चौक, तपोवन रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे रोडवरस फटाकड्यांची स्टॉल लावण्यात आले असून या ठिकाणी सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामुळे अपघाताचा धोका असून विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. कोणतीही परवानगी न घेता सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता फटाके स्टॉल सुरू आहेत. यातून दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा सवालही आता उपस्थित होतोय.या ठिकाणी महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी अधिकृत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली आहे.

आधीच फटाक्याचे वाढलेले भाव सरकारचे सर्व नियम पाळून स्टॉल उभारण्यासाठी येणारा खर्च आणि त्यानंतर ग्राहकांची वाट पाहणे याच बरोबर आता रस्त्यावर बसणाऱ्या अवैध्य फटाक्या विक्रेत्यांची समस्या अधिकृत परवाना घेऊन व्यापाऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular