HomeUncategorizedजलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्विय साहाय्यकावर गोळीबार करणारा मास्टरमाईंड ऋषिकेश शेटे...

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्विय साहाय्यकावर गोळीबार करणारा मास्टरमाईंड ऋषिकेश शेटे यास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

advertisement

अहमदनगर दि.२९ एप्रिल

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला होता राजळे हे आपल्या घरी जात असताना लोहगाव येथे त्यांच्यावर गोळीबार झाला होता त्यांच्यावर अहमदनगर शहरातील मॅक केअर या खाजगी दवाखान्यात उपचार करून पुढे पुण्याला हलवण्यात आले होते.

या गोळीबार प्रकरणी राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्धन राजळे यांच्या फिर्यादीवरून नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा), बबलु लोंढे, संतोष भिंगारदिवे (दोघेही रा. घोडेगाव, ता. नेवासा), ऋषिकेश वसंत शेटे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि इतर दोन ते तीन जणांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितीन शिरसाट याला अवघ्या 24 तासात जेर बंद केले होते दुसरा आरोपी संतोष भिंगारदिवे याला सुद्धा पोलिसांनी पकडले होते
तर यामधील मास्टर माईंड ऋषिकेश वसंत शेटे हा फरार होता.

शेटे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज पहाटे शेवगाव हद्दीतून अटक केली आहे.तर बबलू लोंढअध्यपाही फरार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular