Home जिल्हा पोलीस स्टेशन मधेच पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलिसांना मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल

पोलीस स्टेशन मधेच पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलिसांना मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर दि.१३ मे

श्रीरामपूर येथील एका अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती मात्र श्रीरामपूर पोलिसांनी या बेपत्ता मुलीचा शोध शिर्डी पोलिसांच्या सहकार्याने लावल्यानंतर या मुलीस तिच्या कुटुंबीयांसमवेत श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये आणले होते यावेळी अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीस अटक का केली नाही या विषयावरून श्रीरामपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे आणि अल्पवयीन मुलीचा कुटुंबातील व्यक्तींचा वाद झाला या वादाचे रूपांतर पुढे हाना मारीत होऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्यासह मध्यस्थीस गेलेल्या दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही मारहाण करून त्यांनाही जखमी केल्याची घटना घडलीय.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान अशोक सुरवाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांचेविरुध्द भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version