Homeक्राईमहद्दपार असलेल्या आकाश पवार गावठी बंदुकीसह कॅम्प पोलिसांनी केला जेरबंद..

हद्दपार असलेल्या आकाश पवार गावठी बंदुकीसह कॅम्प पोलिसांनी केला जेरबंद..

advertisement

अहिल्यानगर १३ एप्रिल

कॅम्प पोलिसांनी नगर पाथर्डी रोडवरील बारा बाबळी येथील हॉटेल शौर्य समोर आकाश संजय पवार या दोन वर्षाकरिता हद्दपार असलेल्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे त्या पोलिसांनी ही कारवाई करत आकाश पवार याच्यावर ग्राम पोलीस ठाण्यात बेकायदेशीर हत्यार बाळगण्याबाबत आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

Oplus_0

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीनुसार बाराबाभळी परिसरातील हॉटेल शौर्य समोर एक अज्ञात इसम गावठी बंदूक कमरेला लावून संशयरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, योगेश पवार, पोलीस अंमलदार, विलास गारुडकर, रामनाथ डोळे, प्रमोद लहारे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या संशयित इसमास पकडले असता तो आकाश पवार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला अहिल्यानगर जिल्हातुन दोन वर्षाकरीता हद्दपार केलेले असतानाही तो अहिल्यानगर जिल्ह्यात फिरत असून तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याचं निष्पन्न झाल्याने कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात आर्म अॅक्ट ३/२५, महा.पो.का.क १९५१ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म सो.मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर डॉ. दिलीप टिपरसे सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, योगेश पवार, पोलीस अंमलदार, विलास गारुडकर, रामनाथ डोळे, प्रमोद लहारे यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular