अहिल्यानगर दिनांक 30 जुलै
नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धर्मनाथ टिकाराम जोहरे हे नेवासा फाटा छ. संभाजीनगर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असतांना त्यांना एका स्विफ्ट कार चालकाने छ. संभाजीनगर येथे सोडतो असे म्हणुन कार मध्ये बसवुन घेतले आणि काही अंतरावर गेल्यावर चाकुचा धाक दाखवून व मारहाण करुन त्यांच्या कडील रोख रक्कम्, लॅपटॉप, मोबाईल फोन, घड्याळ काढून घेवून त्यांना निर्जन स्थळी उतरवून दिले.या बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड य यांच्या पथकाने घटनाठिकाणचे आजुबाजुचे रोडचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करुन आरोपीबाबत माहिती जमा करून महेश शिरसाठ यांनी आणि त्याच्या एका साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सापळा रचून
महेश आबासाहेब शिरसाठ वय २६ वर्षे, रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, २) गौरव शहादेव शिरसाठ वय २५ वर्षे, रा. सदर ) यांना पकडले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली . त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, गुन्ह्याचे वेळी वापरलेली कार, मोबाईल, चाकु असा एकुण ६,००,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.