अहिल्यानगर दिनांक 29 ऑक्टोबर
अहिल्यानगर शहरातील पाच डॉक्टरांवर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या स्पष्ट निर्देशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात कारोना असल्याचा बनाव करुन व त्याबाबत खोटे कागदपत्र तयार करुन, करोना संसर्गित रुग्णासोबत मर्जी विरुध्द अॅडमीट करुन त्याच कक्षात रुग्णाचे जिवतावर होणाऱ्या जिवघेण्या परिणामांची कल्पना असतांनी ही अतीतिव्र जास्तीचा ढोस देऊन जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन रुग्णाच्या मृत्युस कारणीभूत होणे, अवाजवी अवास्तव बिल रक्कम आकारणे, शरीराचे अवयवाची तस्करी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

18  ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास हा पूर्वी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या कडे होता.मात्र अचानक हा तपास नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक डॉ दिलीप टिपरसे यांच्याकडे गेला. 18 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर 12 दिवस उलटूनही आरोपी असलेल्या एकही डॉक्टरला पोलिसांनी अटक केलेली नाही.उलट गुन्ह्याच्या तपासादरम्यान तापसी अधिकारी गुन्ह्यातील प्रमुख साक्षीदारांना बोलावून जबाब नोंदविताना त्यांच्यावर दबाव आणत आहेत.असा आरोप मुख्य तक्रारदार अशोक खोकराळे यांनी केला असून. पोलीस उपाधीक्षक डॉ दिलीप टिपरसे डॉक्टर असून यातील आरोपी यांचे शैक्षणिक काळातील मित्र आहेत. त्या मुळे आरोपींना तपासी अधिकाऱ्यांची मदत होऊ शकते. त्यामुळे आज फिर्यादी अशोक खोकराळे आणि  ॲड. अनिकेत कुल्हाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या  प्रकरणातील तपासी पोलीस अधिकाऱ्यांची तपासातून तात्काळ तपास काढून घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच हा तपास एखाद्या
 वरिष्ठ, निष्पक्ष व अनुभवी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा आणि आपण स्वतः या प्रकरणावर विशेष लक्ष ठेऊन तपासाची प्रगती नियमितपणे पाहावी. अशी मागणी केली आहे. 
अशोक खोकराळे यांच्या मागणीनंतर आता हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक कोणाकडे देणार आणि यामधील आरोपी कधी अटक होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
 
            