अहमदनगर दि.१५ जुलै
लोकसभेनंतर आता विधानसभेचे वेध सर्वांनाच लागले आहेत विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे आता सर्वच पक्ष कामाला लागले असून महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेपर्यंत अभेद्य राहणार का नाही अथवा राहिली तरी जागा वाटपात कोणची जागा कोणाला भेटेल हे अद्यापही ठरलेले नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार असल्याचे भाषणात जाहीर केले तसेच अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा अशी त्या ठिकाणी आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच आहे त्यासाठी कामाला लगा उमेदवार नंतर ठरवू असा संदेश खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अहमदनगर शहर विधानसभा ही जागा शिवसेनेकडे येणार असल्यामुळे शिवसैनिक उत्साहात असून आता जोरदार तयारीला लागणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले आहे. तसेच पुढच्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ दिली असून या बैठकीत निवडणुकीची नगर शहराबाबतचे पुढील दिशा ठरणार आहे मात्र नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेकडे आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसूनही खासदार संजय राऊत यांनी दोन जागेवर थेट दावा केला असल्यामुळे आता महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.