अहिल्यानगर दिनांक 4 जानेवारी
झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रभाग क्रमांक तीन हा माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांचा वर्चस्व असलेला प्रभाग आहे. अजिंक्य बोरकर यांनी आपली पत्नी गौरी बोरकर यांनी आपली पत्नी गौरी बोरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा यांची युतीबादौं विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ,शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. निष्ठावंतांची नाराजी तसेच, बदलेली राजकीय समीकरणामुळे भाजपाला निवडणूक सोपी नसल्याचे दिसत आहे.

या प्रभागात भाजपा सह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारी करून भाजपला आणि राष्ट्रवादीला चॅलेंज दिले आहे.
या प्रभागात अ गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान नगरसेवक योगीराज गाडे आणि शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत शेळके यांच्या मोठी चुरशीची लढत होणार आहे. भाजप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागे असून प्रभागाबाहेरचा उमेदवार दिल्याने भाजपचे निष्ठावंत लोक या उमेदवारीवर नाराज आहेत.
ब मधून उध्वसेनेच्या नीलम वाखुरे आणि सोनाली झोटिंग यांच्यात चारशीची लढत होईल.
तर ड मधून भाजप मधून शिवसेनेत प्रवेश केलेले नितीन शेलार,भाजपचे मात्र आता अपक्ष असलेले अभिजीत दरेकर,अपक्ष अर्जुन मदानयांची काटे की टक्कर पाह्यला मिळेल.
या प्रभागात भाजपा मध्ये मोठा असंतोष असून निष्ठावंत उमेदवार डावलून बाहेरील प्रभागातील उमेदवारांना उमेदवारी दिल्याने प्रभातील निष्ठावंत भाजप निवडणूक पासून दूर झाले आहे आणि ती आपली ताकद मतदानाच्या रूपाने दाखवून देतील अशी चर्चा खाजगीत सुरू आहे. भाजपच्या निष्ठावंतांना डावलणे, पक्षातील वरिष्ठांची मक्तेदारी, दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पदे बहाल करणे आदी कारणांमुळे भाजपला निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे.





