HomeUncategorizedअमीर मळा प्रकरण अंगावर डिझेल टाकून पेटवून खून केल्याचा आरोप असलेल्या तिघांचा...

अमीर मळा प्रकरण अंगावर डिझेल टाकून पेटवून खून केल्याचा आरोप असलेल्या तिघांचा अटकपूर्व जामिन मंजुर.

advertisement

अहमदनगर दि.१० ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद रोड अमीर मळा या ठिकाणी 30 ऑगस्ट रोजी एक घटना घडली होती या घटनेमध्ये जागेच्या वादावरून बशीर दिलावर यास खान पठाण,आयुब दिलावरखान पठाण, असीफ आयुबखान पठाण, गुलाब पठाण यांनी दिलावरचे अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले आशा प्रकरची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवण्यात अली होत पोलिसांनी घटना घडल्या नंतर तिनही आरोपींचे विरुध्द खुनाचा प्रयत्न केला म्हणून व गंभीर जखमी झालेल्या दिलावर याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर भा द वि कलम ३०२ खुन केला म्हणून कलम वाढवण्यात आले होते.


या घटनेनंतर जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामिन मिळवण्यासाठी तिनही आरोपी यांनी अॅड. सतिषचंद्र सुद्रिक यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता तसेच पुरावा म्हणून त्यासोबत घटनेचे सी सी टिव्ही फुटेजचे चित्रिकरण दाखल केले असता त्यात संपूर्ण घटनेचे चित्रिकरण कैद झाले होते 6या सीसी टीव्ही फूटेज मध्ये मयत दिलावर यांस कोणीही पेटवले नसून त्याने स्वतःचे पेटवून घेतलेचे दिसून आले तसेच यातील अर्जदार गुलाब हा घटनेचे वेळेस घटना स्थळापासून ४ कि.मी. अंतरावर त्याचे मित्राकडे असल्याचे तेथील सी सी टिव्ही फुटेज मध्ये दिसून आले. तसेच दिलावर भाजल्यानंतर आयुब व असीफ यांनी दिलावर यांना दवाखान्यात हलवतांना मदत केली ही बाब सी. सी, टिव्ही फुटेजमध्ये दिसून आली.

तसेच आसीफ हा मयतास गाडीतून हलवतांना घटना स्थळी आल्याचे व त्यापुर्वी तो तेथे नसल्याचे दिसून येत होते.या सर्व फुटेजहुन दिलावरच्या भाजण्याचे घटनेचा या असा तिनही अर्जदारांचा संबंध नसल्याचे सकृतदर्शनी दिसून आल्याने पूर्वग्रह दूषित कारणाने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद अँड.सतिषचंद्र सुद्रिक यांनी न्यायालयात केला होता त्या आधारे न्यायालयाने तिनही आरोपींना अटकपूर्व जामिन मंजुर केला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular