Homeशहरधार्मिकतेतून परंपरा व संस्कृतीचे जतन - आ. संग्राम जगताप ताठे मळा येथील...

धार्मिकतेतून परंपरा व संस्कृतीचे जतन – आ. संग्राम जगताप ताठे मळा येथील दत्त मंदिर सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ

advertisement

अहमदनगर दि 2  नोव्हेंबर –

महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे तिचे जतन व्हावे यासाठी अध्यात्मिकता वाढीसाठी काम केले पाहिजेत धार्मिक तेथून परंपरा व संस्कृतीचे जतन होते युवा पिढीला अध्यात्मिकेची गोडी निर्माण व्हावी यासाठी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. नागरिकांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सभा मंडपाची खरी गरज असते यासाठी शहरात मंदिरांसमोर सभा मंडपाची निर्मिती होणे गरजेचे आहे त्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे ताठे मळा येथील दत्त मंदिरा समोर भव्य दिव्य सभा मंडप तयार होणार आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाण-घेवाण करता येणार आहे मा.नगरसेवक दगडू मामा पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सभा मंडप मंजूर झाला आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी यावेळी केले.
आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून ताठे मळा येथील दत्त मंदिर समोर सभा मंडप कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी मा. उपमहापौर अनिल बोरुडे, मा. नगरसेवक दगडूमामा पवार, नगरसेवक वंदना ताई ताठे, मा. नगरसेवक विलास ताठे, भीमाशंकर लांडे, निवृत्ती लांडे, संभाजी काळे, दिनकरराव देशमुख, विश्वनाथ जाधव, दीपक खेडकर, मनोज ताठे, श्रीराम तांबोळी, रेवननाथभैय्या पवार, ऋषिकेश ताठे आदी उपस्थित होते.


मा.नगरसेवक दगडू मामा पवार म्हणाले की धार्मिक तेथून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण होते यासाठी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून ताठे मळा येथील दत्त मंदिरासमोर सभा मंडप कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे या भागातील दत्त मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी सभा मंडपाची आवश्यकता होती ती आता पूर्ण झाली आहे धार्मिक ते तून गोडी निर्माण होते असे ते म्हणाले.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular