मुंबई दि.१२ जुलै-
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत असून. माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहीती जाहीर केली जाणार असून बुधवारी NDA ची बैठक असून त्या आधी शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.