Homeविशेषनगर मधील स्वयंघोषित पत्रकार इस्माईल दर्यानी एक कोटी खंडणीप्रकरणी अटक.. जानेवारी महिन्यात...

नगर मधील स्वयंघोषित पत्रकार इस्माईल दर्यानी एक कोटी खंडणीप्रकरणी अटक.. जानेवारी महिन्यात सुरू झाली होती या प्रकरणाला सुरुवात जूनमध्ये झाला शेवट….

advertisement

अहमदनगर दिनांक २८ जून
अहमदनगर शहरातील एक तथाकथित वेब पोर्टलचा स्वयंघोषित पत्रकार एक कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी अटक झाला. मात्र या अटके आधीचे संपूर्ण कहाणी ही जानेवारी महिन्यापासून सुरू होती आणि त्याचा शेवट २८ जून रोजी झाला असला तरी या मधल्या काळात अनेक कारनामे या स्वयंघोषित पत्रकाराकडून केले गेले.

इस्माईल दर्यानी असे या स्वयंघोषित पत्रकाराचे नाव असून अहमदनगर शहरात हा वेब पोर्टल आणि यूट्यूब च्या माध्यमातून पत्रकारिता करत होता. जानेवारी महिन्यात या प्रकरणातील एक महिला आष्टी येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या कार्यालयात गेली होती त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने माजी आमदारांना खाजगी काम असल्याचे सांगत आपल्याशी चर्चा करावयाची आहे असे सांगितले त्यावेळी त्यांनी मला अहमदनगर वरून गायकवाड या महिलेने पाठवले असून त्यांच्याकडे आणि माझ्याकडे तुमची अश्लील चित्रफित आहे जर हे प्रकरण मिटवायचे असेल तर एक कोटी रुपये द्या आणि हे प्रकरण मिटून घेऊ असे सांगितले. मात्र माजी आमदार भीमराव धोंडे यांनी क्लिप दाखव त्यानंतर आपण ठरवू यावर त्या महिलेने गायकवाड यांचे फोन आल्याशिवाय मी क्लिप दाखवू शकत नाही असे सांगितले आणि ती महिला तिथून निघून गेली. त्यानंतर गायकवाड नामक महिलेने आणि बांगर नामक महिलेने अनेक वेळा माजी आमदार यांच्या फोनवर आणि व्हाट्सअप कॉल वर मेसेज पाठवून पैशांची मागणी केली होती त्यानंतर काही कालावधीनंतर या प्रकरणात इस्माईल दर्यानी इंट्री झाली आणि इस्माईल दर्यानी ने आपले कारणाने सुरू केले.

सुरुवातीला इस्माईल दर्याने आपल्या पोर्टल द्वारे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर आरोप करत महिलेला धमकी दिल्याचे बातमी लावली ही बातमी बरोबर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली. त्यानंतर भीमराव धोंडे यांच्या स्वीय सहायकाने इस्माईल दर्यानी याच्याशी फोनवर चर्चा करून बातमी खोटी असल्याचे सांगत ती डिलीट करण्यास सांगितले इस्माईल दर्यानी याने ती बातमी डिलीट केली मात्र इस्माईल दर्यानी याला बरोबर रस्ता सापडल्याने त्याने लगेच दुसरा डाव टाकत ज्या महिलेकडे असलेली चित्रफित आहे त्यांचे प्रकरण मी मिटून देतो असा डाव टाकला याबाबत आपण एकदा मीटिंग करू असा निरोप इस्माईल दर्यानी याने माजी आमदारांच्या स्वीय सहायकाकडे पोहोचवला आणि वारंवार फोन करून मीटिंग विषयी माजी आमदारांना नगरमध्ये येण्यासाठी गळ घातली होती. मात्र हे प्रकरण खोटे असल्यामुळे माजी आमदारांनी याकडे दुर्लक्ष केलं

काही काळापूर्वी नगरहून पुण्याकडे जात असताना माजी आमदारांनी स्वीय सहायकाच्या सांगण्यावरून इस्माईल दर्यानीची भेट घेतली नगर मधील एसबीआय चौकात असलेल्या एका कॅन्टीनवर भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी इस्माईल दर्यानी याने सांगितले की ती महिला एक कोटी रुपये मागत आहे मात्र आपण कमी जास्त पैसे देऊन प्रकरण मिटवून घेऊ असा संदेश दिला मात्र यावेळी माजी आमदार यांनी दुर्लक्ष करत तिथून चर्चा करून निघून गेले. त्यावेळी माजी आमदारांना नकळत माजी आमदार यांच्या स्वीयसहायकाने पंचवीस हजार रुपये इस्माईल दर्यानी याला दिले आणि हे प्रकरण येथेच थांबवा असे सांगितले.

मात्र त्यानंतरही अनेक वेळा इस्माईल दर्यानी याने माजी आमदार भीमराव धोंडे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांना वारंवार फोन करून या प्रकरणाविषयी चर्चा करण्यासाठी आग्रह करत होता तसेच तुमची असली चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल करेल अशा धमक्याही देण्यास सुरुवात केली होती त्यामुळे अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून आमदार भीमराव धोंडे यांनी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा इस्माईल दर्यानी पोलीस पकडण्यासाठी गेले त्यावेळेस त्याने आपण पत्रकार आहोत वॉरंट आहे का तुम्ही मला हात लावू शकत नाही अशी अरेरावीची भाषा वापरली त्याचप्रमाणे शहरातील अनेक मोठमोठे लोक मला सोडवायला येतील तुम्ही मला पकडू नका मी स्वतः पोलीस स्टेशनला येतो इस्माईल दर्यानी हा
पोलीस स्टेशन आल्यानंतर त्याने आपण कोण आहोत हे तुम्हाला माहित नाही का मला सोडवायला अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आमदार येथील असा दम पोलिसांना दिला. विधिमंडळ चालू आहे मी आता बघा एकेकाला कसा कामाला लावतो असेही त्याने पोलिसांना सांगितले मात्र पोलीस खाक्या दाखवताच हात जोडून इस्माईल दर्यानी याने मला या प्रकरणात न वाचवा सोडून द्या अशी विनंती केली मात्र तोपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यास ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी दाखवली होती.

आज इस्माईल दर्यानी आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेला न्यायालयासमोर उभे केले असता दोघांनाही न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत इस्माईल दर्यानी याच्याकडून असलेली चित्रफित हस्तगत करायची आहे पुढील तपास करायचा आहे यामध्ये अजून कोणी सामील आहे का याचाही तपास पोलिसांना करण्याचा असल्याने पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी केली होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular