Home Uncategorized तोतया पत्रकार म्हणून पैसे कमवायचा नवीन फंडा नगरकरांनो सावध राहा..

तोतया पत्रकार म्हणून पैसे कमवायचा नवीन फंडा नगरकरांनो सावध राहा..

अहमदनगर दि.१ ऑगस्ट
अहमदनगर शहरात पैसे कमवण्याचा नवीन फंडा सुरू झाला असून गाडीला धक्का लागला आहे असे कारण सांगून पैसे उकळण्याचे प्रकार नगर शहरात तीन-चार ठिकाणी समोर आले आहेत. मात्र या प्रकाराची पोलीस ठाण्यात कुठे नोंद न झाल्याने नेमका हा प्रकार कोण करतय हे अद्याप उघड झालेले नसले तरी असे प्रकार वारंवार सुरू असून अनेक नागरिकांना यांचा अनुभव आला आहे.

याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल झाली होती आणि त्या पोस्टनुसार 18 जुलैला असा प्रकार घडला असून एक चार चाकी वाहन चालक लालटाकी रोडने एम.आय. डी. सी.कडे जात असताना पत्रकार चौकात सिग्नलला गाडी थांबली. ग्रीन सिग्नल मिळताच तो वाहन चालक पुढें निघाला. नगर मनमाड रोड वरील शिवम टि व्ही एस शोरुम जवळ एका मोटरसायकल चालकाने गाडी आडवी घालुन त्या चारचाकी वाहनचालकाला थांबवले. अचानक झालेल्या प्रकाराने वाहन चालक गोंधळून गेला होता त्याने त्या मोटरसायकलस्वारास काय झाले अशी विचारणा केली त्यावर त्या मोटरसायकल चालकाने पत्रकार चौकात तुमच्या गाडीने तारकपुर रोडवरून सावेडी कडे जाणाऱ्या मोटरसायकलला धक्का दिला आणि त्या गाडी वरील आठ महिन्याच्या प्रेग्नंट महिलेसह तिघेही खाली पडले व महिलेस तारकपुर रोड वरील एका दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे त्यासाठी साडे तीन हजार रुपये खर्च आहे ते द्या अन्यथा मी पत्रकार आहे असेही तो सांगण्यास विसरला नाही. तसेच त्याने त्या वाहनचालकासमोर दोन-तीन फोन लावून वाहन चालकावर दबाव टाकला. अचानक झालेल्या या प्रकारमुळे तो चार चाकी वाहन चालक गोंधळून आणि घाबरून गेला होता त्याने गडबडीत साडेतीन हजार रुपये त्या मोटरसायकलस्वारास दिले मात्र पुढे गेल्यानंतर त्या वाहनचालकालाही लक्षात आले की असा अपघात झाला नाही मात्र हा प्रकार काहीतरी वेगळा दिसतोय त्यामुळे त्या वाहन चालकाने खात्री केली असता हा सर्व प्रकार बनवा असल्याचं लक्षात आले आहे.

पत्रकार आहे असे सांगून लुबडण्याचे असे प्रकार शहरात अनेक ठिकाणी होत आहेत. अनेक तोतया पत्रकार कॅमेरा घेऊन ठिकठिकाणी जाऊन ब्लॅकमेलिंग करत असल्याचे प्रकारही समोर येऊ लागले असून हा पैसे कमावण्याचा नवीनच फंडा आता समोर आला आहे.जे पत्रकार कष्टाने आणि प्रामाणिक काम करत आहेत त्या पत्रकारांना अशा तोतया पत्रकारांमुळे मनस्ताप सहन करावा लागतोय हे नक्कीच..
मात्र असे प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनीही घाबरून न जाता अशा प्रकारची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणे गरजेचे आहे आणि एखाद्या व्यक्तीवर संशयाला तर त्या पत्रकारांबाबत माहिती घेऊन संबंधित संस्थेला कळवणेही तेवढेच गरजेचे आहे जेणेकरून तोतया पत्रकारांवर आळा बसू शकतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version