Homeशहरप्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील रस्ते महानगरपालिकेने भाड्याने दिले की काय ? थेट...

प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील रस्ते महानगरपालिकेने भाड्याने दिले की काय ? थेट रस्त्यावरच उतरून व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण कधी निघणार ? सर्वसामान्य जनता कर कशासाठी भरते ?

advertisement

अहिल्यानगर दिनांक ५ डिसेंबर

अहिल्यानगर महानगरपालिका फक्त ठराविक ठिकाणीच अतिक्रमण मोहीम राबवून ती मोहीम पुन्हा बंद करते. अतिक्रमण करणारे अतिक्रमणाची मोहीम पुढे गेले की मागे पुन्हा अतिक्रमण करत राहतात हे आता सर्वांनाच माहित झाले असून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही याची सवय झाली आहे. मात्र नगरकर महानगरपालिकेकडे कर भरतात ते महानगरपालिकेकडून विविध सेवा मिळून घेण्यासाठी मात्र कर भरूनही नागरिकांना सेवा मिळत नसेल तर हा नागरिकांशी केलेला विश्वासघात आहे.

रस्ते ही महानगरपालिकेची सार्वजनिक प्रॉपर्टी असली तरी काही दुकानदार शहरातील रस्ते ही आपली खाजगी प्रॉपर्टी असल्यासारखी रस्त्यांचा वापर करत आहेत. प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील खाद्यपदार्थांचे गाळेधारक आपले 200 फूट दुकान सोडून पुढे दुकानाबाहेर काही फुटांवर हातगाडा लावून खाद्यपदार्थांची विक्री करतात त्यापुढे या गाड्यांवर येणारे ग्राहक आपली दुचाकी चार चाकी वाहने थेट रस्त्यावरच वाहनतळासारखा वापर करून उभी करतात आणि त्या पुढे उरला तर इतर नागरिकांनी जाण्यासाठी त्याचा वापर करायचा अशी परिस्थिती रोज रात्री या ठिकाणी असते.

या परिसरात प्रोफेसर कॉलनी चौकाकडून तोफखाना पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रोडवर खाद्यपदार्थाच्या गाड्या, पान टपऱ्या दुधाच्या गाड्या रात्रीच्या वेळेस लावल्या जातात मात्र येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या गाड्यांमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या गाड्यांवर आलेले ग्राहक थेट रस्त्यावरच गाड्या पार्किंग करत असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. नगर शहरातील नागरिक हे “कर” भरून महानगर पालिकेकडून सुविधा मिळवण्यासाठी नेहमी मागणी करत असतात मात्र महानगरपालिकेने नगर शहरातील रोड अशा दुकानदारांना भाड्याने दिले की असेच आता सामान्य नगरकर यांना वाटू लागले आहे. कारण या दुकानादारांना कसलीच भीतीही राहिली नाही थेट रस्त्यावरच गाड्या उभ्या करून आपला व्यवसाय सुरू करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हा अडथळा होताना कोणाला दिसत नसेल का? महानगरपालिकेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असूनही महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येत नसेल का ? जाणीवपूर्वक कोणाच्या दबावातून या लोकांवर कारवाई करण्यास महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी भित आहेत असेही आता वाटू लागली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नगरकरांसाठी महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून किमान रस्ते मोकळे करावेत एवढीच अपेक्षा आहे. नाहीतर सर्वच व्यवसायिकांना रस्त्यावर उभा राहून व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी ही आता उपरोधितपणे होत आहे.
पहा अतिक्रमणाचा व्हिडिओ 👇

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular