अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर
सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील महानगर पालिकेच्या मालकीच्या व्यावसायिक संकुलतील गाळेधारकांपैकी अनेक गाळे धारक पोट भाडेकरू असून अनेक मूळ गाळेधारकांनी मुखत्यारपत्र करून हे गाळे परस्पर महापालिकेला न सांगता विकलेले आहेत.अनेक मूळ मालकांचे करारनामे संपुष्टात आले आहेत तर अनेक गाळेधरककांचे भाडे थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
महानगरपालिकेच्या मार्केट विभागाने नुकतीच प्रत्यक्ष या संकुलात जाऊन प्रत्येक गाळेधारकांचा पंचनामा केला आहे. यामध्ये अनेक गाळेधारक पोट भाडेकरू असल्याचे निष्पन्न झाले असून एक गाळा दोन ते तीन लोकांना विकला असल्याचेही समोर आले आहे.
2015 साली याठिकाणी महापलिकेने जुने व्यापारी संकुल पाडून तेथे भव्य व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र तत्कालीन राजकारण आणि ४३ गाळेधारकांनी महापालिकेच्या संकुल उभारणीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. याची मागील महिन्यात सुनावणी होऊन न्यायालयाने ३५ गाळेधारकांच्या याचिका फेटाळल्या. तर राहिलेल्या ८ याचिकांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे यात राजेश हार्दवानी यांची याचिका रद्द करण्यात आली आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणारे विधीज्ञ प्रसन्न जोशी यांनी दिली आहे.
अनेक दुकानदारांनी गाळ्यांची रचना बदलली आहे, ज्या व्यवसायांसाठी मनपाने गाळे दिले होते, ते व्यवसाय बंद होऊन तेथे अनेक मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत, असेही महानगरपालिकेने प्रत्यक्ष केलेल्या पंचनाम्यात समोर आले आहे.
त्या समाजसेवकाने केला हा कारनामा
हे व्यापारी संकुल अर्ध गोलाकार वर्तुळ असून या संकुलाच्या पश्चिम बाजूस आणि पश्चिम बाजूस एका समाजसेवकाला मोकळी जागा महानगरपालिकेने कराराने दिली होती हा करारही संपुष्टात आला असून या मोकळ्या जागेवर त्या सेवकाने पक्के बांधकाम करून ते परस्पर इतरांना मोठ्या किमतीत विकले असल्याचेही समोर आले आहे.तर पश्चिम बाजूस एकाने पक्के बांधकाम बांधून भाड्याने दिले आहे. महानगरपालिकेच्या दप्तरी ही जागा मोकळी असल्याचा दिसतय मात्र या ठिकाणी अनेक वर्षांपासून गाळे बांधून व्यवसाय केला जात आहे. तसेच हे गाळे भाड्याने दिले तर काही गाळे विकल्याचाही समोर आले आहे यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
एका गाळधारकाच्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे एक मूळ गाळाधारक मयत झाला असून त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने संबंधित गाळा मुखत्यारपत्राद्वारे दोन जणांना विकला असल्याचं महानगरपालिकेच्या दप्तरी दिलेल्या अर्जात दिसून येत असताना कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना पुन्हा एकदा या गाळ्यात मी किराणा दुकानाचा व्यवसाय करत असल्याचे या महिला गाळेधारकाने लिहून दिल आहे. त्यामुळे कोर्टासमोर सर्व सत्य परिस्थिती आहे.
नगर मधील सावेडी भागातील व्यापारी संकुलाच्या ज्या भानगडी तुम्ही छापत आहात. त्याबाबत मीच सर्व कागदपत्रे पालिकेला दिली.कारण त्याची कागदपत्रे पालिकेत सापडतच नाही.प्रत्यक्षात तेथे झालेल्या भानगडी एवढ्या भयानक आहेत कि,माझ्याकडुन एेकल्यावर तुम्ही कोमातच जाल !!🤮🤑🤮🤑☠️