Homeशहरतपोवन रोड भागात उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या कुंटनखाण्यावर पोलिसांचा छापा

तपोवन रोड भागात उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या कुंटनखाण्यावर पोलिसांचा छापा

advertisement

अहमदनगर दि.१४ जुलै

अहमदनगर उपनगर मधील तपोवन रोड भागात असणाऱ्या सूर्य नगर परिसरात एका बंगला चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून तीन महिलांसह काही पुरुषांना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पक्षाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे . शहरातील सूर्य नगर भागात एका घरामध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक नंदुरकर महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे हेड कॉन्स्टेबल अनिता पवार, पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवन पोलीस कॉन्स्टेबल लोहाळे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश बोरकर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण करडुले,पोलीस कॉन्स्टेबल तैसिन शेख या कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी दोन महिला आरोपींसह सचिन शेडगे, किरण पवार, अक्षय काला, मच्छिंद्र पवार, गणेश बडे यांना ताब्यात घेतले. तर कैलाश काला पसार झाला आहे. फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी फिर्याद दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular