HomeUncategorizedजीएसटीविरोधात राज्यातील व्यापा-यांचा एल्गार, पुण्यात होणार राज्यव्यापी परिषद

जीएसटीविरोधात राज्यातील व्यापा-यांचा एल्गार, पुण्यात होणार राज्यव्यापी परिषद

advertisement

पुणे दि.६ जुलै

जीएसटी परिषदेने  खाद्यांन्न आणि अन्नधान्य ही जीएसटीच्या परिघात आणण्याचा निर्णय घेतला आहे.काही खाद्यांन्न पदार्थ आणि अन्नधान्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्याची शिफारस केली आहे. तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, व्होट पेंड, पनीर, दही, लस्सी, ताक, मध, सेंद्रीय खत, नारळ पाणी आदी वस्तूंचा समावेश आहे. या दैनंदिन वस्तूंवर जीएसटी लागू केल्यास महागाई भडकण्याची शक्यता आहे आणि त्याची झळ सामान्यांना बसणार आहे. सर्वसामान्य जनेतवर हा बोजा पडू नये यासाठी पुण्यात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.8 जुलै रोजी मार्केट यार्डातील, दी पूना मर्चंट्स चेंबरच्या व्यापार भवन सभागृहात ही परिषद होईल. या परिषदेत व्यापारी पुढील रणनिती ठरवणार आहे.

चंदीगड येथे जीएसटी परिषदेची 47 वी बैठक नुकतीच झाली. त्यात तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, व्होट पेंड, पनीर, दही, लस्सी, ताक, मध, सेंद्रीय खत, नारळ पाणी आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली. जीएसटी परिषदेने सुचवलेल्या या शिफारशींमुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर बोजा पडणार आहे. तसेच हे पदार्थ दैनंदिन वापरातील असल्याने महागाईचा भडका उडेल अशी भीती आहे. जनतेच्या भावना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्यापा-यांनी जीएसटी परिषदेच्या निर्णयाविरोधात हा एल्गार पुकारला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular