Homeशहरजाहीर नोटीस

जाहीर नोटीस

advertisement

             जाहीर नोटीस व आवाहन
तमाम जनतेस या जाहीर नोटीस व आव्हानाव्दारे कळविण्यात येते की, अमेरिकन मिशन ( मराठी मिशन)
|आणि युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीज (अमेरिकन बोर्ड) व्दारा क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल पूर्वीचे नाव अमेरिकन मिशन गर्ल्स स्कूल तत्पूर्वीचे नाव ख्रिश्चन व्हर्नाक्युलर एज्युकेशन सोसायटी, अहमदनगर
(भिंगार हद्दीतील पूर्वीचे सिटी सर्व्हे नं. ३२१ तद्नंतर जुना सिटी सर्व्हे नं. ३५३ व ३५६ अ, ब, क ही मिळकत
ट्रस्ट मिळकत आहे. मा. धर्मादाय आयुक्त दप्तरी पी. टी. आर. रेकॉर्डवर प्रॉपर्टीजच्या नोंदी आहेत. सदरच्या
| मिळकती या ‘सेवा चाकरीचे’ वतन जात इनाम वर्ग-२ म्हणून काझी यांना दिलेल्या होत्या. इनाम अॅबॉलिश
| अॅक्ट अन्वये सदरच्या मिळकती दि. ०१/०२/१९५४ रोजी खालसा करण्यात आल्या आहेत व त्याचा फेर १४६० दि. २०/०३/१९५४ आहे, असे असतांनाही काझी यांनी सदरची मिळक़त नौशाद अ.पा.क. धनकबाई (करसेटजी अॅण्ड सन्स) यांचेकडे गहाण ठेवली होती. मिशनने १९५६ साली दावा क्र.२२/१९५६ अन्वये काझी मोहम्मद कबिरोद्दीन व तमजोद्दीन यांचे मार्फत दावा करुन सदरच्या मिळकती गहाणमुक्त केल्या व त्यावेळी सर्व पैसे कोर्टात भरले. त्यामुळे प्रांत साहेब यांनी दि. ०५/०१/१९६३ रोजी सदरच्या मिळकती गहाणमुक्त झाल्याचा आदेश दिलेला होता व आहे. दि. २५/०३/१९५४ रोजी नौशाद एदलीजी नगरवाला यांचे नाव सिटी सर्व्हे नं. ३५३ व ३५६ अ, ब, क मिळकती वरुन मा. मामलेदार साहेब यांचा आदेश दि. १८/१०/१९६२ व मा. प्रांत साहेब यांचेकडील अपिल नं. ८/६२ चे निकालावरुन त्यांची नावे कमी करून अमेरिकन मिशनच्या नावाची नोंद दाखल केली त्याचा फेर २०२६ असा आहे. याशिवाय ब्रिटीश गर्व्हमेंट काळात सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन कौन्सिल यांनी ख्रिश्चन व्हर्नाक्युलर एज्युकेशन सोसायटी अमेरिकन मिशन (युनायटेड चर्च बोर्ड) यांना दि. ०१ डिसेंबर १८९२ रोजी २९ फेब्रुवारी १८६८ च्या काझी यांच्या करारातील शर्तीनुसार पैसे भरून घेऊन करारनामा ‘रिग्रॅन्ट’ केलेला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाकडील आदेश क्र. ४३७३ / १२२५०१-१६ दि. १९/१२/१९७५ आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश आर.टी.एस.नं. ८/७८ दि. ०९/०३/१९७८ चे निकालानूसार युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीज (अमेरिकन मिशन) संस्थेस कायमकुळ (संरक्षीत कुळ म्हणून सिटी सर्व्हे नं. ३५३ व ३५६ अ.ब.क.) मिळकतीसाठी जाहीर केलेले आहे. त्याचा फेर ३०१९ असा आहे व प्रॉपर्टी कार्डावर तशा नोंदी आहेत. असे असतानाही काही लोकांनी पोकळीस्त खरेदीखते करुन सदरच्या मिळकती बळाचा व गुंडगिरीचा वापर करून कब्जा ठोकण्याचा प्रयत्न करत आहेत.तमाम जनतेस कळविण्यात येते की, सर्व सिटी सर्व्हे क्र. ३५३ व ३५६ अ, ब, क त्यांना फायनल प्लॉट नं.१५, टि.पी. स्कीम नं. ३ व ४ मध्ये मिळक़तीच्या नोंदीवर युनायटेड चर्च बोर्डाचे नाव प्रॉपर्टी कार्डावर आहे. प्रत्यक्षात सदरच्या मिळकती आमचे संस्थेच्या ताबा, कब्जा, वापर व वहिवाटीत १८६४ सालापासून आहेत. संस्थेने सदर मिळकतीवर शाळा, कर्मचारी, निवासस्थाने, सामाजिक कार्य, मिशनरी बंगले व मैदाने मुली आणि मुलांचे खेळासाठी वापरली जातात. संपूर्ण मिळकतीस कंपाऊंड वॉल असून चार मोठे गेट आहेत. १जुनी वसंत सिनेमा समोर – १ मधीलबाडी व दोन गट, नगर- पुना रोडवर आहेत. तसेच सिसल हॅन्डीक्राफ्ट,
रोझ कॉटेज बंगला (अहमदनगर मिशन हॉस्पिटल ) व वाय. एम. सी. ए. ग्राऊंड व कर्मचारी निवासस्थाने आहेत.
| प्रकाश लक्ष्मण कुलकर्णी, जयंती लक्ष्मण कुलकर्णी, मिनाक्षी लक्ष्मण कुलकर्णी यांना संस्थेने कधीही मिळकतीचा ताबा व कब्जा दिलेला नाही. कुलकर्णी यांनी मोजणी बाबतची खोटी व बनावट कागदपत्रे (मोजणी) नकाशे तयार करुन शासनाची व संस्थेची फसवणूक केलेली आहे. संस्था त्यांचेवर फसवणूक केली व खोटी दस्तऐवज तयार केले म्हणून फौजदारी स्वरुपाची कारवाई करणार आहे. सदरच्या सर्व मिळकत ३५३ व ३५६ अ,ब,क
(क्लेरा ब्रुस गर्ल्सनावाने ओळखली जाते) ही आमचे ताबा व कब्जा वापर व वहिवाटीत आहे. ही मिळकत आमच्या ताब्यात (Passion) असल्याचे कोर्टाने देखील मान्य केलेले आहे. संस्थे विरुध्द कोर्टामार्फत ताबा सोडण्या संदर्भात (Dispossess) बाबत कोणत्याही मे. कोर्टाचा आदेश झालेला नाही. सदरील पोकळीस्त खरेदीखते आमचेवर बंधनकारक नाहीत. आम्ही कायम माननारे असून कायद्यांचे पालन करतो. तथाकथित पोकळीस्त खरेदीखताव्दारे तथाकथित मालकांनी मे. कोर्टातून ताबा मिळवावा. गुंडगिरी व झुंडशाही करुन हत्यारे व अग्निशस्त्रे दाखवून आमचे ताबा व कब्जास अडथळा करु नये. प्रत्यक्ष ताबा, कब्जा व वापर मराठी मिशन आणि युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीज (क्लेरा ब्रुस गर्ल्स व बॉईज स्कुल) यांचे शैक्षणिक कामासाठी वापरले जाते. संपूर्ण मिळकतीस कंपाऊंड भिंत आहे.अशी परिस्थिती असतांना राजकीय पुढारी / पोकळीस्त खरेदीने झालेले तथाकथित तोतया मालक / बिल्डर माफिया व कब्जा ठोक गॅग मार्फत रात्री-बेरात्री भाडोत्री गुंडाना हाताशी धरून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करून, दहशत निर्माण करुन ताबा घेण्याचा अनधिकृतपणे मिळकतीमध्ये प्रवेश करून, गेटची कुलुपे तोडून मोठ मोठी पत्र्याचे शेड ३ ते ४ ट्रकमध्ये आणून कायदा मोडून व हातात घेऊन ताबा घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत करणाऱ्याावर व ज्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी शिक्षण घेऊन स्त्रीयांना शिक्षित करण्याचे महान कार्य केले. त्या
क्लेरा ब्रुस शाळेची मिळक़त वाचविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, समाजसेवक, नगरसेवक, समाज बांधव व तमाम नागरिकांनी अल्पसंख्याक संस्थेस सहकार्य करावे, मा. पोलिस प्रशासनाने संस्थेस व संस्था चालक यांना संरक्षण द्यावे व गुंडावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करावी व मिळकतीमध्ये अवैध प्रवेशास प्रतिबंध करावे.
डि.जी. भांबळ,डॉ. विजया अ. जाधव, बिशप बिपीनजॉन एम. मसीह
मराठी मिशन
बिशप ऑफ महाराष्ट्र
मो. ९६०४८१२५६०
मो. ९८२२५१०९२१

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular