पुणे दि ३० मार्च
धानोरी येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर दगडफेक करत गंभीर मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी व जेसीबी चालक सुभाष कांबळे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी धानोरी रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम सुरू होती. या कारवाईला स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी विरोध केला. महापालिकेला मोठी अतिक्रमणे दिसत नाहीत, गोरगरीब कष्टकरी व्यापारी व पथारी चालक व्यवसायिक यांच्यावर कायमच कारवाया केल्या जातात. शहरात सातत्याने रस्त्यावरील अतिक्रमणांवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू आहे. त्यातच मंगळवारी सुरु असलेल्या धानोरा येथील कारवाईत संतप्त जमावाने दगडफेक केली. या कारवाईत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी यांना जमावाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जेसीबी वर केलेल्या दगडफेकीत चालक सुभाष कांबळे ते जखमी झाले आहेत
पहा व्हिडीओ 👇