Home Uncategorized पावसाळा उघडला आता शहरातील रस्त्यांची कामे टप्प्या- टप्प्याने मार्गी लावू – आ.संग्राम...

पावसाळा उघडला आता शहरातील रस्त्यांची कामे टप्प्या- टप्प्याने मार्गी लावू – आ.संग्राम जगताप

अहमदनगर दि.२९ ऑक्टोबर –
शहर विकासासाठी राज्य शासनाकडे विकास निधीसाठी पाठपुरावा केला असल्याने रस्त्याच्या विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त झालेला आहे. आता पावसाळा उघडला असून रस्त्यांच्या विकास कामांना गती देऊ प्रभाग क्रमांक १४ मध्ये पवार चाळ येथील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागले आहे आता टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व रस्त्यांचे कामे मार्गे लागले जातील, नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासाची कामे व्हावी यासाठी दर्जेदार कामे करून घेतली जातील, नागरिकांनी विकास कामांमध्ये सहभाग नोंदवून शहर विकासाला साथ द्यावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
            प्रभाग क्र.१४ मध्ये पवारचाळ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मा. नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र ओस्तवाल, डॉ.राहुल झंवर, प्रेमानंद तलरेजा, साहेबराव शिरसाट, संजय क्षेत्रे, सलीम शेख, सुरेश पाटील, नंदू पाटोळे, शफी शेख, रईस शेख, भीमराज रणदिवे, युनूस शेख, राजेंद्र भोसले, श्रीनिवास झंवर, शाहिद जहागीरदार, कलीम शेख, विमल शिरसाठ, कल्पना नरवडे, शकुंतला केदारे, चंद्रभागा उभाळे, सुभद्राबाई शेडाळे, इरफान बागवान, संतोष सातपुते, सुहास पाटोळे, किरण चाबुकस्वार, फारुख शेख, पप्पन तलरेजा, अजय कळमकर, परविन बागवान, जबेदा शेख, संतोष भोसले, मोसिन शेख, सुनील भोसले, सतीष शिरसाठ, विकी नरवडे, धर्माकांत दिवटे, गणेश शेळके, विजय फुलसौंदर आदी नागरीक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाबरोबरच प्रभाग क्रमांक १४ मधील विकास कामांना गती दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाव्यात यासाठी मनपाचे सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे बुरुडगाव रोड येथे काम सुरू झाले आहेत या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सुमारे 26 कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे. याचबरोबर सारसनगर येथे युवकांना खेळाचे मार्गदर्शन व्हावे यासाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्सची निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे. शहरातील नागरिकांना मनोरंजनासाठी साई उद्यान येथे म्युझिकल फाउंटनची उभारणी होत आहे. या सर्व विकासकामांच्या माध्यमातून शहर विकासाला गती प्राप्त होईल असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version