HomeUncategorizedराजयोग प्युअर व्हेज रेस्टॉरंट चा शुभारंभ संपन्न खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी स्वादपूर्ण...

राजयोग प्युअर व्हेज रेस्टॉरंट चा शुभारंभ संपन्न खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी स्वादपूर्ण सेवा देण्यासाठी राजयोग हॉटेल सज्ज – आ. संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.११ ऑक्टोबर  –
आमचे आजोबा कै. बलभीमराव जगताप यांनी लकी हॉटेल च्या माध्यमातून ७० वर्षापूर्वी व्यवसायामध्ये आमचे कुटुंब उतरले आहे. नगर शहरामध्ये प्युअर व्हेज रेस्टॉरंट उभारण्याची संकल्पना मा.अरुणकाका जगताप यांनी सुचवली त्यानुसार उच्च प्रतीचा आहार तसेच भव्य दिव्य हॉल,लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन,जूस बार, एका वेळेस ४०० नागरिक भोजनाचा अस्वाद घेवू शकतात. इंटरनॅशनल च्या धरतीवर आशिष पोखरणा यांच्या सूचनेनुसार राजयोग हॉटेलची निर्मिती केली आहे. नगर शहरामध्ये प्युअर व्हेज हॉटेलची निर्मिती करण्याचा आमचा मानस होता प.पू.आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने या जागेमध्ये चातुर्मास संपन्न झाला होता त्या संकल्पनेतून प्युअर व्हेज हॉटेल सुरू केले आहे.
नगर शहरातील खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी स्वादपूर्ण सेवा देण्यासाठी हॉटेल राजयोग सज्ज झाले आहे. सेवेच्या माध्यमातून नक्कीच नगरकरांच्या पसंतीस उतरेल असे मत आ.संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.
          स्टेशन रोड स्वस्तिक चौक येथे राजयोग प्युअर व्हेज रेस्टॉरंट चा शुभारंभ सौ.पार्वतीताई जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मा.आ. अरुणकाका जगताप, खासदार सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, डॉ. दीपक, नगरसेविका शितलताई जगताप, सुवर्णाताई जगताप, डॉ. वंदनाताई फाटके, डॉ. विजय भंडारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         यावेळी आशिष पोखरणा म्हणाले की, नगर शहरामध्ये इंटरनॅशनल च्या धरतीवर हॉटेल राजयोग व्हेज हॉटेलची निर्मिती केली आहे. नगर शहरामध्ये व्हेज रेस्टॉरंट सर्वात मोठे आहे व्हेज मधील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खवय्यांना मिळणार आहे. विविध प्रकारचे फ्रुट ज्यूस, नाष्टा व व्हेज जेवण मिळणार आहे. नगरकरांनी आवश्यक भेट देऊन प्युअर व्हेज जेवणाचा अस्वाद घ्यावा असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular