HomeUncategorizedनाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजप कडुन .राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर...

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजप कडुन .राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर पुन्हा रंगणार थोरात विरुद्ध विखे यांच्यात सामना

advertisement

मुंबई दि.१४ ऑक्टोबर

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून (Congress) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर त्यांना विरोधी उमेदवार कोण असेल या बाबत तर्क वितर्क सुरू असतानाच भाजप कडून डाॅ.राजेंद्र विखे पाटील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


या मतदारसंघासाठी भाजपचे नेते तथा विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पुन्हा विखे विरुध्द थोरात असा सामना रंगणार आहे. राजेंद्र विखे पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये तब्बल २० वर्षे काम केले आहे. ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन, विद्वावता, आणि सल्लगार परिषदेचे सदस्यही होते. लोणीतील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठचे ते कुलपती आहेत.

डॉ. तांबे हे गेली तीन टर्मपासून या मतदासंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांचे ते मेहुणे आहेत.भाजपकडून विखेंना उमेदवारी मिळाल्याने नगरमधील विखे-थोरात यांच्यातच खऱ्या अर्थाने सामना रंगनार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular