HomeUncategorizedराज्यसभा निवडणूक 6 जागा, 7 उमेदवार मैदानात आता लक्ष 10 जून कडे

राज्यसभा निवडणूक 6 जागा, 7 उमेदवार मैदानात आता लक्ष 10 जून कडे

advertisement

मुंबई दि. ३ जून

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली असून राज्यसभेची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी (mahavikas agahdi) आणि भाजपच्या (bjp) उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात असणार आहेत.

 

पहिले पाच उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय होणार आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी होणारी लढत चुरशीची होणार आहे. या जागेसाठीची दोन्ही पक्षांची मदार ही अपक्ष उमेदवारांवर असल्याने अपक्ष कुणाच्या पारड्यात मते टाकतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार उभे आहेत. तर भाजपकडून धनंजय महाडिक उभे आहेत. दोन्ही नेते कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा कोणता गडी दिल्लीत जातो याकडेही सर्वांच लक्ष लागलं असून येत्या 10 जून रोजी याबाबतचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular