Home Uncategorized युवासेना प्रमुख विक्रम राठोड यांच्या पासून जीविताला धोका

युवासेना प्रमुख विक्रम राठोड यांच्या पासून जीविताला धोका

अहमदनगर दि.१० मे

हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते गजेंद्र सैंदर यांना शिवसेनेत प्रवेश कर आणि माझ्या मार्गदर्शना खाली काम कर असे वारंवार सांगूनही सैंदर यांनी दाद न दिल्याने या गोष्टीचा राग मनात धरून युवासेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख विक्रम राठोड यांनी खोटा गुन्हा दाखल करून आता लग्न मोडण्याची धमकी देत असल्याचा आरोप गजेंद्र सैंदर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

राम नवमीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीत गजेंद्र सैंदर यांनी कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद विक्रम राठोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली होती या प्रकरणात गजेंद्र सैंदर यांना अटकपूर्व जामीन मिळला असून आपल्यावर दाखल झलेला गुन्हा खोटा असून या प्रकरणाची चौकशी करावी तसेच माझ्या लग्न होऊ देणार नाही, तुला जगू देणार नाही ,तुला हद्दपार करेल आशा धमक्या विक्रम राठोड देत असल्याचा आरोप सैंदर यांनी केला आहे.

विक्रम राठोड याच्या पासून माझ्या व माझ्या कुटुंबियांना जीविताला धोका असून माझ्या जीबीतला धोका झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार विक्रम राठोड असतील असे निवेदन गजेंद्र सैंदर यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version