अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर
अहमदनगर शाहरतील मार्केटयार्ड मधील ताराचंद बोथरा यांच्या दुकानावर छापा टाकून कोतवाली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेशन दुकानात विकणारा तांदूळ एका खाजगी दुकानात पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी पोलिसांनी केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड मधील एका दुकानात रेशनचा तांदूळ विक्रीसाठी आणून ठेवला आहे.अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक एकाच वेळी तिथे पोहोचले. त्यामुळे काही काळ कारवाईवरून चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती ही कारवाई नेमकी कोणी केली याबाबत ही शाब्दिक चकमक झाली मात्र अखेर संयुक्त कारवाई म्हणून कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.
विशेष म्हणजे एकीकडे सरकार गोरगरिबांसाठी धान्य मोफत देत असताना हे धान्य गरिबांच्या पोटात न जाता धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन त्याची परस्पर विक्री होत आहे. याबाबत मागील महिन्यात आवाज महाराष्ट्र या वेब न्यूज पोर्टलवरून एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती अहमदनगर शहरात कशाप्रकारे रेशनच्या मालविक्रीचे रॅकेट सुरू आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती मात्र जिल्हा पुरवठा विभाग नेमका काय करतो असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.