Homeशहरनगर अर्बन बँके बाबत रिझर्व्ह बँकेने घेतली पुन्हा "ही" भूमिका

नगर अर्बन बँके बाबत रिझर्व्ह बँकेने घेतली पुन्हा “ही” भूमिका

advertisement

अहमदनगर दि.६ सप्टेंबर

नगर अर्बनमल्टीस्टेट-शेड्युल्ड( Nagar Urban Bank) बँकेच्या कारभारावर भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank ) सहा महिन्यांसाठी घातलेले निर्बंध आता आणखी तीन महिने वाढवले आहेत. आता येत्या 6 डिसेंबर पर्यंत रिझर्व्ह बँकेचे निर्बंध बँकेवर कायम राहणार आहेत. 6 डिसेंबर 2021 पासून निर्बंध जारी केले गेलेले निर्बंध अजूनही लागू असून सहा डिसेंबरला निर्बंध लागू केलेल्या दिवसाला एक वर्ष पूर्ण होईल.

ठेवीदार व खातेदारांना एकदाच 10 हजारापर्यंत रक्कम काढता येणार, नव्या ठेवी स्वीकारता येणार नाही, नवे-जुनेकर्ज प्रकरण करता येणार नाही, नवे कर्ज वाटप करता येणार नाही, बचत व चालू खात्यावरील व्यवहार करता येणार नाही, असे हे निर्बंध असून मागील वर्षी सत्य आलेल्या संचालकांपैकी काही संचालकांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे

असल्याने सत्तेवर आलेल्या संचालकांना एक प्रकारे वेसणच घातली गेली. तीन महिन्यांसाठीचे हे निर्बंध 6 सप्टेंबर 2022 पर्यंत होते. त्यामुळे हे निर्बंध उठणार की, कायम राहणार की बँक अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू होणार, याबाबत कुतूहल होते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कायम ठेवले आहे. त्यामुळे बँकेचा कारभार सु़धारण्यासाठी आणि थकीत कर्ज वसुली प्राधान्याने करण्यासाठी विद्यमान संचालकांना शेवटची संधी दिल्याचे बोलले जात आहे.

सत्ताधारी संचालक मंडळाने मागील नऊ महिन्यात १५ हजारावर थकबाकीदारांकडून १८७ कोटी रुपये कर्ज वसूल केले आहेत.तसेच नुकतीच बँकेस एक रक्कमी कर्जफेड योजनेस मंजुरी मिळाली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular