अहिल्यानगर दिनांक 13 नोव्हेंबर
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक जवळ आली असून 17 प्रभागांसाठी नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली मात्र आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेक इच्छुकांच्या हिरमोड झाला असून काहींना या आरक्षण सोडवतेमुळे लॉटरी लागली आहे मात्र गेल्या महिन्याभरापासून म्हणजेच दिवाळीपासून घरोघरी इच्छुक उमेदवारांचे जे जाहिरात पत्रक जात होते ते पत्रक मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बदललेले असून अनेक ठिकाणी रात्रीतून कुटुंबातील महिलांचेही फोटो आता उमेदवारांच्या प्रसिद्धी पत्रकार (पोम्प्लेट)आले आहेत तर राजकीय नेत्यांच्याही फोटोंमध्ये बदल झाला असून दिवाळीमध्ये जे जाहिरात पत्रक वाटण्यात येत होते त्यावरील मजकूर त्यावर असलेले नेत्यांचे फोटो आणि इच्छुक उमेदवारांचे फोटो रात्रीतून बदलले असून आता अनेक ठिकाणी महिलांचे फोटो आणि नेत्यांचे फोटो बदललेले दिसून आले आहेत.

अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठी जागा राखीव झाल्यामुळे पुरुष उमेदवारांना याचा फटका बसला असून आता कुटुंबातील एखाद्या महिलेला या जागेवर उभे करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्रीतून जाहिरात पत्रक बदलण्यात आले असून आता कुटुंबातील महिलांना या जाहिरात पत्रकावर स्थान देण्यात आल्याचं अनेक ठिकाणी दिसून आले आहे.
तसेच जोपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अंतिम होत नाही तोपर्यंत अनेक वेळा हे पत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे कारण एकाच पक्षाकडून प्रत्येक प्रभागात अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे तिकीट कोणाला फायनल होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या पक्षाकडे जाऊन उमेदवारी करायची असल्यास जाहिरात पत्रक बदलून त्यावरील राजकीय नेत्यांचे फोटो बदलावे लागणार आहेत.





