अहिल्यानगर दिनांक 13 एप्रिल
अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील तारकपूर रोड वरील विस्किन मळा येथील ओढ्यावरील पुलाचे काम अखेर आज मार्गी लागले आहे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून रखडलेले हे काम मार्गी लागले असून हे काम तकिया ट्रस्टच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे रखडले होते. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी आज आक्रमक भूमिका घेत महानगरपालिकेचे आयुक्त तसेच बांधकाम विभाग आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना ही काम मार्गी लावण्यासाठी सूचना देऊन त्वरित काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
या रोडचे काम अनेक दिवसांपासून रखडले असून तकिया ट्रस्टच्या ट्रस्टींनी घेतलेल्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे विकास कामे रेंगाळली होती. आज आमदार संग्राम जगताप आणि तकिया ट्रस्टच्या ट्रस्टमध्ये चांगलीच खडाजंगी झाली जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेऊन अखेर हे काम त्वरित सुरू करावे अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.





