Homeराजकारणबंद पडलेले नगर मनमाड रोडचे काम महिनाभरात सुरू करा, नगर पाथर्डी रोड...

बंद पडलेले नगर मनमाड रोडचे काम महिनाभरात सुरू करा, नगर पाथर्डी रोड तसेच नगर दौंड रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी भरावी निधीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा खा.सुजय विखे पाटील यांची माहिती

advertisement

अहमदनगर दि.४ ऑगस्ट

गुरुवारी दिल्ली येथे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली तसेच या वेळी नगर जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

बहुचर्चित नगर- मनमाड रस्त्यासाठी पुन्हा एकदा टेंडर प्रक्रिया करून नव्याने निविदा काढण्याचे व येत्या महिन्याभरात नवीन ठेकेदार नेमण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिले असून संपूर्ण रस्त्याचे नव्याने काम सुरू होईपर्यंत रस्त्याच्या मेंटेनन्स साठी १५ कोटींचे टेंडर काढण्याची सूचना यावेळी देण्यात आली.

तर अत्यंत खराब झालेल्या नगर- पाथर्डी रस्त्यासाठी ८.४५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीच्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली.यासोबतच नगर – दौंड रस्त्यावरील बेलवंडी येथील रेल्वे ओव्हर ब्रीज च्या कामासाठी अतिरिक्त १६ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

यावेळी सुरत- हैदराबाद ग्रीनफिल्ड अलाईन्मेंट प्रोजेक्ट मध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना २ मीटर कच्चा रस्ता करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देखील करण्यात आल्या.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular