Homeक्राईमआरटीओ अधिकारी गीता शेजवळ लाच लुचपतच्या जाळ्यात

आरटीओ अधिकारी गीता शेजवळ लाच लुचपतच्या जाळ्यात

advertisement

अहिल्यानगर दिनांक २४ सप्टेंबर

अहिल्यानगर शहरातील प्रादेशिक उप परिवहन कार्यालयातील गीता भास्कर शेजवळ यांच्यावर आणि एजंट म्हणून काम करता असलेल्या खाजगी इसम इस्माईल पठाण यांच्यावर तीन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हकीगत अशी की तक्रारदार हे मौजे पाटस येथून श्री सिमेंट कंपनी मधून ते अहिल्यानगर येथे ओव्हरलोड सिमेंट ची गाडी चालवून देण्यासाठी तक्रारदार यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर येथे दिनांक 22/09/2025 रोजी समक्ष येऊन भेट घेतली असता . सदर ठिकाणी आलोसे मोटर वाहन निरीक्षक , अहिल्यानगर श्रीमती गीता शेजवळ आणि खाजगी इसम इस्माईल पठाण यांनी तक्रारदार यांच्या कडे ओव्हरलोड गाडी त्यांच्या हद्दीतून चालून देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. तक्रारदार यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी आज दिनांक 24/09/2025 रोजी ला. प्र. वि. कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे समक्ष हजर राहून लेखी तक्रार दिली होती.

दिनांक 24/09/ 2025 रोजी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची शासकीय पंच समक्ष आलोसे श्रीमती गीता शेजवळ आणि खाजगी इसम इस्माईल पठाण यांच्याकडे तक्रारदारास पाठवून पडताळणी केली असता आलोसे मोटर वाहन निरीक्षक, शेजवळ आणि खाजगी इसम इस्माईल पठाण यांनी तक्रारदार यांच्या कडे ओव्हरलोड गाडी त्यांच्या हद्दीतून चालून देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे 3000/ रुपयांची लाच मागणी करून तडजोडी अंती 3000/ रुपये स्वीकारण्याचे कबूल केले.

दिनांक 24/09/2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर येथे मोटार वाहन निरीक्षक, श्रीमती गीता शेजवळ आणि खाजगी इसम, इस्माईल पठाण यांची लाच मागणी पडताळणी केली .नंतर दिनांक 24/09/2025 रोजी शासकीय पंच समक्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय , अहिल्यानगर या ठिकाणी सापळा कारवाई आजमावली असता खाजगी इसम इस्माईल पठाण यांनी तक्रारदार यांच्या कडून ओव्हरलोड गाडी त्यांच्या हद्दीतून चालून देण्या करिता आलोसे गीता शेजवळ यांच्या सांगण्यानुसार 3000/ रुपये शासकीय पंच समक्ष, खाजगी इसम यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय समोर चांदणी चौक परिसरामध्ये स्वीकारले असता खाजगी इसम इस्माईल पठाण यांना सापळा पथकाने ताब्यात घेतले आहे.

आलोसे मोटार परिवहन निरीक्षक व खाजगी इसम यांनी तक्रारदार यांच्या ओव्हरलोड गाडीची हद्दीतून वाहतूक करून देण्यासाठी 3000/ रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 3000/स्वीकारले. तसेच मोटार वाहन निरीक्षक यांनी लाच मागणी प्रोत्साहन दिले. सबब आलोसे मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता शेजवळ आणि खाजगी इसम इस्माईल पठाण यांच्या विरोधात पोलीस ठाणे भिंगार कॅम्प , अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

*सापळा तपासी अधिकारी *
राजीव तळेकर ,पोलीस पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
सापळा सहाय्यक अधिकारी* :- संतोष तिगोटे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर

मार्गदर्शक* :- श्रीमती, माधुरी केदार कांगणे मॅडम, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. श्री. शशिकांत सिंगारे , अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर. मोबा.
श्री. सुरेश नाईकनवरे, पो. उप अधिक्षक
ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर
*सापळा पथक -* पोह राजेंद्र सीनकर, दीपक इंगळे, प्रकाश घुगरे पोअंम, सी. एन. बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular