Home शहर समर्थ नगर पाण्याच्या टाकी खालील बूस्टर पंप बसविण्याच्या कामाची पाहणी.शहराचे पुढील पन्नास...

समर्थ नगर पाण्याच्या टाकी खालील बूस्टर पंप बसविण्याच्या कामाची पाहणी.शहराचे पुढील पन्नास वर्षांचे विकास कामांचे कायमस्वरूपी चे नियोजन सुरू – आ.संग्राम जगताप

अहमदनगर –
बुरूडगाव रोडवरील समर्थ नगर पाण्याच्या टाकी खाली बूस्टर पंप बसविण्याचे काम पूर्ण होऊन पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभा मधील पाण्याची  पातळी कमी असली तरी बूस्टर पंपाद्वारे समर्थ नगर टाकी भरण्यासाठी मदत होणार आहे. शहरामध्ये फेज टु योजनेअंतर्गत विविध भागांमध्ये पाण्याच्या टाक्या तयार असून अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच या सर्व टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जातील व नगरकरांना फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. उपमहापौर गणेश भोसले यांनी समर्थ नगर पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला असून त्या कामाला अखेर यश आले आहे. शहराचा पुढील पन्नास वर्षाचा विचार करून विकासाची कामे सुरू  आहेत. समर्थ नगर पाण्याच्या टाकीमध्ये अनेक वर्षानंतर बूस्टर पंप द्वारे पाणी टाकण्यात आले त्यामुळे लवकरच बुरूडगाव रोड परिसराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
बुरुडगाव रोड समर्थ नगर पाण्याच्या टाकी खाली बूस्टर पंप बसविण्याच्या कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मा. नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक अविनाश घुले,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, माऊली जाधव, सोनू घेंमुड, वैभव ढाकणे, विराज भोसले, निलेश हिंगे, मळू गाडळकर, संतोष ढाकणे,संजय कर्डिले, विशाल मदने आदी उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, बुरुडगाव रोड परिसराचा अनेक वर्षाचा पाणी प्रश्न  मार्गी लागणार आहे समर्थ नगर पाण्याच्या टाकी खालील बूस्टर पंप, पंप हाऊस व विद्युत डीपी बसविण्याचे काम पूर्ण होऊन पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे लवकरच सर्व कामे पूर्ण होतील व बुरूडगाव रोड परिसराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे समर्थ नगर पाण्याच्या टाकीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version