HomeUncategorizedसंपदाच्या ठेवीदारांना संक्रांतीची गोड भेट मिळणार का ? संपदा पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी १५...

संपदाच्या ठेवीदारांना संक्रांतीची गोड भेट मिळणार का ? संपदा पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी १५ जानेवारीला अंतिम सुनावणी होण्याची शक्यता..

advertisement

अहमदनगर दि.१२ जानेवारी

संपदा पतसंस्थेत 2011 मध्ये आर्थिक घोटाळा झाला. या घोटाळ्याला आता तेरा वर्ष झाले आहेत मात्र अजूनही अनेक ठेवीदार आपल्या ठेवी मिळवण्यासाठी झगडत आहेत. तर काही ठेवीदार मरण पावले आहेत. संपदा पतसंस्थेच्या 26 कोटी 61 लाख 65 हजार रुपयांची जबाबदारी 18 संचालकांवर मे 2015 ह्या वर्षी निश्चित करण्यात आली होती. या पतसंस्थेवर अवसायिकाची नेमणूक झाल्यानंतर संथगतीने कर्ज वसुली सुरू आहे तर अनेक ठेविदार आता मरण पावले आहेत.

हे प्रकरण न्यायालयात असून गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली आता या गैरव्यवहार प्रकरणावर १५ जानेवारी रोजी सुनावणी होणार असून, अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालाकडे ठेवीदारांचे लक्ष लागून आहे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे यासह संचालक न्यायालयात हजर होते.

पतसंस्थेच्या गैरव्यवहारप्रकरणी संस्थापक ज्ञानदेव वाफारे याच्यासह तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. पतसंस्थेत तब्बल ३८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular