अहमदनगर दि.१६ फेब्रुवारी
शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून गावातील कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे.
नेटके वस्ती येथे गावातील कचरा टाकण्याकरीता खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी रावु नेटके,बॉबी नेटके,राणा नेटके , दिपक नेटके ,अतुल नेटके ,गणेश ससाणे यांनी येऊन सरपंच लोंढे यांना मारहाण करत शिवीगाळ केली तसेच लज्जास्पद वर्तन केले या नंतर सरपंच लोंढे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम 354,324,323,427,504,143,147,148,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अहे.