HomeUncategorizedपुण्यात झाले अहिल्यानगर मध्ये कधी... शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल व्हॅन मध्ये...

पुण्यात झाले अहिल्यानगर मध्ये कधी… शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल व्हॅन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा,महिला अटेंडंट ठेवणे सक्तीचे..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 13 जून

पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलिसांकडून आणि शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या अपघातांच्या आणि अपहरणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणं आणि महिला अटेंडंटची नियुक्ती करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या सहकार्याने श एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शालेय बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. आता शाळांकरिता काही सक्तीचे नियम करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य करण्यात आला आहे.

६ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी महिला अटेंडंट असणे आवश्यक केले आहे. बस चालवणाऱ्या चालक, कंडक्टर आणि क्लीनर यांची पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. नियम मोडणाऱ्या शाळांना आणि वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शाळा प्रशासन किंवा बस मालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास, संबंधित वाहनांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुण्यात झालेले हे नियम अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातही होणे गरजेचे आहे. कारण अनेक शाळा कॉलेज मध्ये जाण्यासाठी स्कूलबस चा वापर होत असतो. मध्यंतरी काष्टी परिसरात अशीच एक घटना घडली असून स्कूल बस चालकानेच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले होते. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, परिवहन अधिकारी आणि शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे बाबत एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular