अहिल्यानगर दिनांक 4 डिसेंबर
अहिल्यानगर शहरातील माऊंट लिटेरा झी स्कुल या शाळेत ९ वी मध्ये शिकणारी १३ वर्षाची अल्पवयीन मुलीला त्या शाळेतील नूर मॅडम मुस्लीम महिला शिक्षिकेने विश्वासात घेवून तीला जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहाद या मध्ये अडकवण्याचा प्रकार केलेला समोर आलेला आहे.

या शिक्षिकेने मुलीस एक काम सांगितले नंतर दुस-या दिवशी तिला विश्वासात घेवून तिची घरची माहिती काढली, घरात कोण कोण राहत, धरचा व्यावसाय काय आहे परिस्थिती कशी आहे. आई वडिलांसोबत मुलीचे संबंध कसे आहेत याची सखोल माहिती मिळवली. मुलगी एकुलती एक आहे समजल्यावर दुस-या दिवशी रॅपर नसलेले चॉकलेट तिला खायला दिले. त्यानंतर मुलीला २ ते ३ दिवसानंतर उलट्या झाल्या, गुंगी आली आणि त्याच्या दुस-या दिवशीपासून मुलगी मौहमकडे इस्लामची मजहबची माहिती घ्यायला लागली, मला नमाज पढायला शिकवा अशी मागणी या शिक्षिकेकडे करायला लागली.
यानंतर या नूर मॅडमने मुलीला इंस्टाग्रामया आयडी ओपन करून दिला एका मुस्तकिन तांबोळी नावाच्या मुस्लीम मुलाशी ओळख करून दिली आणि मुलीच्या परवानगी शिवाय तीचा मोबाईल नंबर त्या मुलाला दिला, तुमचे बहिण भावाचे नाते आहे असे मुलीला सांगून त्यांच्यात नातेसंबंध बनवून दिले. काही दिवसानंतर त्या मुलामार्फत “हमारे में सब चलता हे” असे बोलून तीच्याशी जवळीक करून संबंध बनवून तीच्याशी रिलेशनशिप मध्ये आला. इतक्यात न थांबता या मुलाने इतर २५ अल्पवयीन मुलांशी संबंध जुळवून दिले तीच्या इंस्टाग्राम ला ते जोडून दिलेले आहेत.
काळीजादू वशीकरण प्रकारामध्ये या मुलीस २ अत्तराच्या बाटल्या एक घरात ठेवण्यासाठी व एक सोबत ठेवण्यासाठी देण्यात आल्या, खडीसाखर सारख्या दिसणा-या गोळ्या तसेच पॅरासिटेमोल च्या १०० गोळ्या खायला दिल्या एक चावी देण्यात आली.
तीला आईवडिलांचा राग आल्यावर ही चावी हातात घ्यायची असे सांगण्यात आले. तीला दोन काळे बॉल, २ नाणे देवून तीला तीच्या वडीलाच्या तिजोरीत ते ठेवण्यास सांगितले, एक माळ, दोन अंगठ्या, गोंडा लावलेला एक पेन दिला, काळी जादू करून या गोष्टी तीला दिल्या गेल्या,
अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रकार घडलेला आहे. अशा प्रकारे या व अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांमध्ये अशा प्रकारचे गंभीर प्रकार चालू आहेत व अल्पवयीन हिंदू मुलीवर शाळेतील मुस्लीम शिक्षिकेमार्फत अशा प्रकारचे प्रयोग चालू आहेत.
हा अतिशय गंभीर प्रकार असून या बाबत सदर शाळेतील नुर मॅडम व तीला सहकार्य करणा-या इतर शिक्षकांची सखोल चौकशी करण्यात यावी व यामार्फत अजून किती मुलींना या प्रकारामध्ये यांनी अडकवलेले आहे तसेच हे करण्यामागे अजून कोण कोण व्यक्तींचा सहभाग आहे व हे रॅकेट उघडकीस आणून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना भेटून आमदार संग्राम जगताप यांच्यासह शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी केली आहे.





