अहिल्यानगर दिनांक २९ नोव्हेंबर
नागरिकांना त्यांच्या शासकीय कामांमध्ये अडीअडचणी येऊ नये आणि त्यांची कामे लवकरात लवकर कमी वेळेत योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी शासनाने जास्तीत जास्त सेतू कार्यालय आणि ई सेवा केंद्र सुरू केले पण या ई सेवा केंद्रांमध्ये काय प्रकार चालतो यावर अंकुश ठेवण्यासाठी कुणी आहे का ? असा प्रश्न पडलाय एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरणे किंवा ही माहिती इतर ठिकाणी जात असेल तर हा किती मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यांवर नेमकं काय होणार आहे याबद्दल कोणालाही कशाचीही भिती नाही त्यामुळे शहरातील सर्व सेतू कार्यालयाच्या चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन केली आहे.
या निवेदनात त्यांनी एका महिलेबरोबर घडलेल्या प्रसंगाचे उदाहरण देऊन मोठा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.जुन्या महानगरपालिका मध्ये एका महिलेने तिच्या मुलाच्या नावाच्या बदलाबाबत अर्ज केला होता पण त्या अर्जाशी संबंधित कागदपत्र काढण्यासाठी महानगरपालिकेतील लोकांनीच जुन्या महानगरपालिकेसमोरील ई सेवा केंद्रामध्ये पाठवले त्या ठिकाणी काही लोक असतात काम करणारे ३ जण आणि बाहेर बसणारे टवाळखोर ३० जण असतात तरी त्या महिलेने कागदपत्रांसंदर्भामध्ये सर्व माहिती देऊन ती तिथून निघून गेली.
मात्र तिला धक्का जेव्हा बसला जेव्हा तिच्या मोबाईल वर त्याच सेतू केंद्रातून एक फोन आला कारण तिने कोणालाही स्वतःचा नंबर दिला नसत नाही तिला व्हाट्सअप मेसेज वर कागदपत्र काढून देण्याच्या बहाण्याने तेथील एका मुस्लिम युवकाने सदर महिलेला
थेट व्हाट्सअप वर मेसेज केला की मी तुम्हाला मुलाचे अमुक कागदपत्र काढून देतो त्यानंतर अवांतर बोलायला सुरुवात केली तुम्ही काय काम करता, पाच मिनिटे फोनवर बोला वगैरे. हे फार धक्कादायक प्रकार आहे अशा पद्धतीने जर एखाद्या महिलेबद्दल इतका मोठा काम चुकारपणा किंवा असुरक्षितता होत असेल तर या ई सेवा केंद्रांवरती लोकांनी विश्वास ठेवायचा कसा वैयक्तिक माहिती ही या ई सेवा केंद्रांमधून जर बाहेर जात असेल आणि तेथील कर्मचारी अथवा कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेले लोक त्या वैयक्तिक माहितीचा वापर करत असतील तर हा लव्ह जिहादचाच एक प्रकार आहे हिंदू मुलींना मेसेज करणे त्यांना गोड गोड बोलून जवळीक वाढवण्याचा हा एक प्रकार आहे असल्याचेही सुमित वर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे.
ही ई सेवा केंद्रे काय या धंद्यांसाठी उघडली आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपणास विनंती आहे की सर्व ई सेवा केंद्राबद्दल तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत सर्व ई सेवा केंद्रामध्ये
नागरिकांची असलेली वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवता येईल आणि नागरिकांमध्ये या ई सेवा केंद्रा बद्दल सुरक्षेची भावना कशी तयार होईल यावर आपण लक्ष द्यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
उघडकीस आलेला हा प्रकार एक आहे पण उघडकीस न आलेले असे किती प्रकार असू शकतात ? किती भगिनी या गोष्टीला बळी पडलेला असतील शहरांमध्ये बहुतांश ही सेवा केंद्र ही विशिष्ट समाजालाच का देण्यात आली आहे. याबद्दल देखील लोकांमध्ये बरीच प्रश्न आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आज छोटी गोष्ट म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष करू नये या ई सेवा केंद्राच्या माध्यमातून बांगलादेशी, रोहिंग्यांना देखील खोटे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि कागदपत्रे बनवून दिले जातात का ?
याबद्दल देखील शंका उपस्थित होत आहेत सर्व ई सेवा केंद्रांचे ऑडिट तात्काळ करावे अशी ही मागणी सुमित वर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.