Homeक्राईमजलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीयसहायकावर गोळीबाराच्या घटने नंतर आता शंकरराव गडाख...

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीयसहायकावर गोळीबाराच्या घटने नंतर आता शंकरराव गडाख यांची पहिली प्रतिक्रिया..

advertisement

नेवासा – दि.२४ एप्रिल
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई येथे काम पाहणारे स्वीयसहायक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार झाला होता. त्यातच आता जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांच्या बद्दल  चुकीचे शब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याचं समजतंय. राहुल राजळेवर हल्ला नसून, माझ्यावर झालेला हल्ला आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. असे काही होईन असे माझ्या मनात ही नव्हते. काही दिवसांपासून खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे, असा आरोप गडाख यांनी केला आहे.

राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर नगर शहरातील मॅक केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात आले आहे.

गडाख पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात खोट्या-नाट्या केस दाखल करून आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेत. माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते. नेवासा तालुक्यातील राजकारण खालच्या स्थरावर चालले आहे. मात्र, मला पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. ते नक्कीच आरोपींना शोधून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular