अहमदनगर दि.१४ ऑगस्ट
अहमदनगरच्या सुपुत्राने लंडन मध्ये फडकवला भारताचा झेंडा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथील उद्योजक शरद काळे पाटील यांनी लंडन येथे झालेल्या सायकल स्पर्धेत लंडन-ईडनबर्ग- लंडन अशा 1540 किमी सायकल स्पर्धेत सहभाग घेऊन ही स्पर्धा पूर्ण यशस्वीरीत्या पूर्ण करून भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना इंग्लंडच्या भूमीत भारताचा झेंडा इंग्लंड मध्ये फडकवला.
ही अतिशय अवघड अशी स्पर्धा होती सात ऑगस्ट रोजी सुरू झालेली ही स्पर्धा 12 ऑगस्ट रोजी संपली यामध्ये या काळामध्ये 1540 किलोमीटर अंतर पूर्ण करायचे होते हा टप्पा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला या अगोदर त्यांनी सायकल, मोटरसायकल यामध्ये आपल्या देशात विविध विक्रम आपल्या नावावर केले आहेत . वयाच्या 55 व्या वर्षी त्यांची ही जिद्द पाहून अनेक नाव युवकांनी प्रेरणा मिळेल