Homeसांस्कृतिकअहमदनगर शहरात शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ बुऱ्हानगर येथे जगदंबा मातेच्या मंदिरात भगत...

अहमदनगर शहरात शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ बुऱ्हानगर येथे जगदंबा मातेच्या मंदिरात भगत कुटुंबीय केडगाव येथील रेणुका माता मंदिरात अनिल ठुबे व अनिता ठुबे तर नागापूर येथील रेणुकामाता मंदिरात आ.संग्राम जगताप व शितल संग्राम जगताप याच्या हस्ते घटस्थापना

advertisement

अहमदनगर दि.२६ सप्टेंबर

नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हानगर येथील जगदंबा मातेच्या मंदिरात घटस्थापना करून महाआरती करण्यात आली यावेळी गुरव ॲड.विजय भगत,ॲड अभिषेक भगत, राजेंद्र भगत, किरण भगत, सुभाष भगत, अजिंक्य भगत, कुणाल भगत, कविता भगत, दुर्गा भगत, अंजली भगत, रोहन भगत, संकेत भगत, मनीषा भगत, सुनंदा भगत, अंकिता भगत, वैभवी भगत, अमोल जाधव, वेद भगत, गौरी भगत आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील रेणुका माता मंदिरात घटस्थापना व महाआरती अनिल ठुबे व सौ अनिता ठुबे यांच्या हस्ते करण्यात आली. नागापूर येथील रेणुकामाता देवस्थानच्या वतीने आ.संग्राम जगताप व सौ.शितल संग्राम जगताप याच्या हस्ते आज महापूजा,आरती करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की,नागापूर येथील रेणुका माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानला पुरातन काळातील धार्मिक वारसा लाभलेला आहे. अध्यात्मिक व धार्मिकतेतून सुसंस्कृत पिढी निर्माण होते आपल्या महान परंपरेचे जतन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, आपले सण- उत्सव उत्साहात साजरे करावे यावेळी नगरसेविका शितल संग्राम जगताप, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक राजेश कातोरे, दत्ता पाटील सप्रे, सागर सप्रे, प्रभाकर भोर, एकनाथ वाघ, विश्वस्त साहेबराव भोर, राजू भोर, दत्तात्रय विटेकर, गोरख कातोरे, विष्णू भोर, किरण सप्रे, कचरू भोर, सुखदेव सप्रे आदिसह देवस्थानचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular