Homeराजकारणमुंबईत शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या नगर ते मुंबई...

मुंबईत शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या नगर ते मुंबई पदयात्रेला सुरुवात

advertisement

अहमदनगर दि.२६ सप्टेंबर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे( यांच्या शिवसेनेला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर(shivaji park) घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्याने राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये चांगलचा उत्साह संचारला आहे. एका बाजूला ठाकरे यांना ऐनवेळी दगा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जशी लक्षणीय आहे, तशीच ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त करणाऱ्यांच्याही असल्याचे दिसून येते. याच निष्ठेतून नगरमधील निष्ठावान शिवसैनिक मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी(Dussehra gathering)पदयात्रेने निघाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त करण्यासाठी ही पदयात्रा(march )आयोजित केला आहे.

दररोज सुमारे ३० किलोमीटर पायी चालत, मुक्काम करीत, रस्त्याने येणाऱ्या गावांमध्ये शिवसेनेसंबंधी प्रबोधन करीत ही यात्रा जाणार आहे. नगरमधून सुमारे दोनशे निष्ठावान सैनिक यात सहभागी झाले आहेत. बाकीचे दसऱ्याच्या दिवशी वाहनांनी मुंबईत पोहोचणार आहेत. जाण्याची ठरविले आहे. नऊ दिवस पायी चालून दहाव्या दिवशी ही पदयात्रा मुंबईत पोहचणार आहे. दक्षिणेचे शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे सर आणि उत्तरेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तसेच उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा सुरू झाली आहे.

पहा व्हिडिओ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular