Homeजिल्हाशिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांतजी गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दसरा मेळाव्यासाठी नगर ते...

शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांतजी गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दसरा मेळाव्यासाठी नगर ते मुंबई पायी यात्रा नियोजन बैठक

advertisement

श्रीगोंदा दि.१४ सप्टेंबर

मुंबई येथे सालाबाद प्रमाणे शिवसेनेचा(Shiv Sena) दसरा मेळावा(Dussehra Mela.)होणार की यावर्षी नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होणार याकडे सर्वच महाराष्ट्राचे (maharashtra) लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे(Shiv Sena district head Shashikantji Gade )सर यांच्या नेतृत्वाखाली नगर ते मुंबई(nager to mumbai) पायी यात्रा निघणार आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी श्रीगोंदा तालुका शिवसेना युवा सेना तर्फे १५ सप्टेंबर रोजी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली असून श्रीगोंदा येथील शिवसेना संपर्क कार्यालय वडाळी रोड येथे सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील त्या बैठकीसाठी सर्वच पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असून मुंबई येथे ज्या कार्यकर्त्यांना जायचं आहे त्यांचे नाव नोंदणी तसेच पुढील कार्यक्रम काय असणार याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही पायी यात्रा निघणार आहे
या बैठकीला तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवा सैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे अशी नम्र विनंती श्रीगोंदा शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular