HomeUncategorizedआम्हाला ते संपर्क प्रमुख म्हणून ते नकोच या पदाधिकाऱ्यांने मांडली भर सभेत...

आम्हाला ते संपर्क प्रमुख म्हणून ते नकोच या पदाधिकाऱ्यांने मांडली भर सभेत भूमिका

advertisement

अहमदनगर दि १८ जुलै

अहमदनगर शहरांमध्ये आज संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना त्यांची एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती मात्र अखेर बैठकीमधील सर्वच सविस्तर माहिती समोर आली असून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय आणि प्रतीज्ञापत्र करून देण्याबाबत चा निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीत थेट संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर हे आम्हाला नको अशी भूमिका एका पदाधिकाऱ्याने मांडली असून याआधी भाऊ कोरगावकर यांच्या विरोधात अनेक शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र आता थेट भाऊ कोरगावकर यांच्यासमोरच तुम्ही आम्हाला नकोत अशी भूमिका एका महिला पदाधिकारी आणि माजीवनागरसेविकेच्या पतीने   मांडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागाचा एक भव्य मेळावा नगर शहरात झाला होता त्यावेळी सुद्धा भाऊ कोरगावकर यांच्या प्रतिमेचे दहन काही शिवसैनिकांनी केले होते आणि त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली होती त्यानंतर आता थेट त्यांच्या समोरच त्यांच्या विरोधी भूमिका मांडल्याने वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular