नवी दिल्ली दि.१९ जुलै
: महाराष्ट्रानंतर आता केंद्रातही शिवसेनेला मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ल यांची भेटही घेतली. शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात यावी, तसंच मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांना कायम ठेवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शिंदे गटाची मागणी मान्य केल्याची माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





